Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणजुन्नर : विज पडून 12 शेळ्यांचा मृत्यु, कुटुंबावर कोसळले संकट

जुन्नर : विज पडून 12 शेळ्यांचा मृत्यु, कुटुंबावर कोसळले संकट

जुन्नर, (रवींद्र कोल्हे): गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे विज पडून 12 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे आणि त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.

सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक 1 जून 2022 रोजी गुळुंचवाडी येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल आणि त्यांची पत्नी कमल कोतवाल हे सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी रानात गेले होते.

जुन्नर : ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

धोंडिबा कोतवाल शेळ्या चारत असताना दुपारी तीन नंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली. पाऊस याला लागला म्हणून शेळ्यांनी निवऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला आणि नेमका त्याच झाडावर विज पडली आणि त्यात धोंडिबा कोतवाल यांच्या 8 आणि शिवाजी कोतवाल यांच्या च4 अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना पण विजेच्या झटक्याचा मुका मार लागल्याचे कमल कोतवाल यांनी सांगितले.

HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

जुन्नर : खून प्रकरणीतील मुख्य सूत्रधार आटोळेला लोकल क्राईम ब्रँचकडून अटक

कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.

अपघाताची माहिती मिळताच संतोष आग्रे, ज्ञानेश्वर संभेराव यांनी आणे येथील तलाठी कार्यालयाला संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी पाऊस जोरात चालू असल्यामुळे पाऊस उघडताच पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने ताबडतोब नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय