मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या विरोधात राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. विरोधकांनी विधानपरिषदेत देखील सोमय्या यांच्या व्हिडिओचा मुद्दा उचलला. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भुमिका मांडली आहे.
किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. जितेंद्र आव्हाड आणि मुलगी नताशा यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. आव्हाड यांनी वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे या प्रकाराचा मी निषेध करतो असे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे की, राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तिक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.
त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.
मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही, असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटवर त्यांची मुलगी नताशाने प्रतिक्रिया दिली आहे, ज्या मध्ये त्यांनी सोमय्यांबाबतचा एक अनुभवाला सांगितला आहे. नताशाने म्हटले आहे की, बाबा, जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात, तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते. तेव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे ! असं नताशाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा
ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर
ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज