Saturday, April 27, 2024
HomeNewsJEE परीक्षेचा आज निकाल ; लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार सकाळी 10 वाजता...

JEE परीक्षेचा आज निकाल ; लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार सकाळी 10 वाजता !

IIT मुंबई (IIT Mumbai) द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल आज सकाळी 10 वाजता जाहीर होईल. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

जेईई-अ‍ॅडव्हान्स (JEE-advance) निकालातील विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकींगसह (All India Ranking) कॅटेगरी रँक देखील जाहीर केली जाईल. JEE-Advanced परीक्षा 28 ऑगस्टला देशातील 225 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. (JEE-Advance result to be announced today; Download Result)

देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या सर्व 23 शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या B.E, B.Tech आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी JEE Advanced आयोजित केले जाते. यावर्षी आयआयटी बॉम्बेने आयआयटी जेईई परीक्षेचे आयोजन केले होते. JEE Advanced 2022 चा निकाल यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्यांना समुपदेशन प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय