Thursday, April 25, 2024
HomeNewsअभिमानास्पद : 'वंदे भारत'ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला अवघ्या 5 तासात गुजरात...

अभिमानास्पद : ‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला अवघ्या 5 तासात गुजरात ते मुंबई !

मुंबई : बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. मात्र, भारताची सर्वात वेगवान रेल्वे ‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला आहे.पिकअपच्या बाबतीत वंदे भारतने बुलेट ट्रेनला पछाडले आहे. ० ते १०० किमी ताशी वेग पकडण्यासाठी वंदे भारतने केवळ ५२ सेकंद घेतले. तर बुलेट ट्रेनला ५४ सेकंद लागतात.


वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी वंदे भारतने केवळ ५२ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी एवढा वेग घेतला. बुलेट ट्रेनला यासाठी ५४.६ सेकंद लागतात. त्यामुळे या गाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे.अहमदाबाद-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू हाेणार आहे. ही गाडी ३० सप्टेंबरपासून सुरू हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ही भेट प्रवाशांना मिळू शकते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय