Friday, April 26, 2024
Homeजुन्नरजावजी केंगले व साधना दधीच यांना आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती...

जावजी केंगले व साधना दधीच यांना आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती पुरस्कार प्रदान

घोडेगाव : अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने दिला जाणारा ‘आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जावजी केंगले व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साधना दधीच यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करण्याचे हे दुसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नामदेव कोळप होते. घोडेगाव येथे नुकताच हा स्मृतीपुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना डॉ.हनुमंत भवारी म्हणाले, शंकरराव विठू केंगले यांचे विचार समाजाला दिशा देणारे होते. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. हिरडादर प्रश्न असेल, पुनर्वसनाचा प्रश्न असेल या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष उभा केला होता. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे आणि समाजाला दिशा देणाऱ्या विचारांना साथ देणे गरजेचे आहे. तरच समाज उन्नतीकडे जाईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी राजपुर गावचे सरपंच चंद्रकांत लोहकरे, माळीण गावचे सरपंच रघुनाथ झांजरे, आहुपे गावचे सरपंच रमेश लोहकरे, एस.एफ.आय.संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी इ.उपस्थित होते.

किसान सभेचे अशोक पेकारी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राजू घोडे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या मानपत्राचे वाचन केले. व अशोक जोशी यांनी सुत्रसंचलन केले.

या कार्यक्रमाचे संयोजन किसान सभा,आंबेगाव तालुका समितीचे पदाधिकारी नंदा मोरमारे, रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर, बाळू काठे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, लक्ष्मण मावळे, कमल बांबळे, देविका भोकटे, दत्ता गवारी यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय