Sunday, December 4, 2022
Homeजुन्नरप्रविण ताजणे यांना जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत पुरस्कार

प्रविण ताजणे यांना जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत पुरस्कार

जुन्नर / आनंद कांबळे : शाहीर देवा कांबळे लोककला मंच पुणे व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान वाहिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत पुरस्कार अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर विद्यालयातील विज्ञान शिक्षक प्रविण रामदास ताजणे यांना देण्यात आला.

याप्रसंगी राजगड ज्ञानपीठ पुणेचे विशेष कार्यकारी अधिकारी तात्याराव जेटीथोर, एन.सी.ई.आर.टी. पुणेच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. नेहा बेलसरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर शिरसागर, मानसोपचार समुपदेशक रत्ना गोसावी, एस.सी.ई.आर.टी. पुणेचे अधिव्याख्याता अरुण जाधव, आयोजक व लोककला मंचाचे देवराव कांबळे, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड, ए.पी.आय. प्रवीण फणसे, मोतीराम कांबळे व गीतांजली गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्त्यासाठी विद्यार्थीना मोफत मार्गदर्शन, व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन, आदिवासी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी मोफत व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन आयोजनामध्ये सहभाग, मार्गदर्शनामुळे विद्यालयातील प्रकल्पाची जिल्हा व राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड, तालुका विज्ञान प्रदर्शनात, बालविज्ञान परिषेदत, GMRT विज्ञान प्रदर्शनात परिक्षक म्हणून काम केले आहे, कोरोन कालावधीत विविध विषयांवर ऑनलाई व्याख्यानांचे आयोजन आदि शैक्षणिक कामांची दाखल घेऊन जिल्हास्तरीय तंत्रस्नेही गुणवंत पुरस्कार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराबद्दल शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पुंडे, उपाध्यक्ष देवेंद्र खिलारी, डॉ.विलास चव्हाण, सचिव विलास पानसरे, सहसेक्रेटरी निलेश गुंजाळ, खजिनदार सुनिल ढोबळे व सर्व संचालक, जी.एम.आर.टी.खोडदचे वित्तीय प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोलंकी, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, उपाध्यक्ष वाय.बी. दाते, सदस्य ज्ञानेश्वर केंद्रे, दिलीप लोंढे गणित अध्यापक संघाचे सचिव प्रशांत शेटे, खजिनदार व्यंकट मुंढे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.व्ही.दुराफे, पर्यवेक्षक ए.बी.शिंदे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महात्मा फुले प्रतिष्ठान जुन्नर, समता परिषद जुन्नर व महात्मा फुले ब्रिगेड पुणे जिल्हा व जुन्नर तालुका सदस्य आदींनी प्रवीण ताजणे यांचे अभिनंदन केले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय