Sunday, May 19, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : कविता ; माझा भारत महान - प्रशांत बिराजे

जनभूमी साहित्य : कविता ; माझा भारत महान – प्रशांत बिराजे

कविता



माझा भारत महान

असा कसा प्रसंग बाका, आम्हावरी आला,

कोरोना रूपी राक्षसाने घातला जगावरी घाला.

कैद झाली घरामध्ये संपूर्ण मानवजात,

अमेरिके सारख्या बलाढ्य देशालाही, सहन होईना हा आघात.

गरिब देश माझा भारत, पण जिद्द कमालीची,

टाटा अंबानी तर इथलेच आहेत, पण गोड भाकर ती स्व-कमाईची.

जर प्रश्न देशाचाच असेल, तर आम्ही भारतीय म्हणवून घेतो,

येवूदेत लाख संकटं, शिकवण आमची तशी, आम्ही कोथळाच बाहेर  काढतो.

दिडशे वर्षं सोसलीये गुलामी, हा कोरोना तर आत्ता आलाय,

वाचवण्या देशाला, प्रत्येक डॉक्टर आणि पोलिस जिवावर उदार झालाय.

भय नाही आता कोरोनाचे, खंबीर आमच सरकार,

सहनशक्तीच्या जोरावर, करू कोरोनोवर अंतीमसंस्कार.

कोरोना विरुध्दच्या या लढाईत, आम्ही लवकरच विजयी होऊ,

माझा भारत महान, गीत पुन्हा अभिमानाने गाऊ..

नाव- प्रशांत प्रकाश बिराजे. 

फोन नं. – 7385754359.

पत्ता – दादा खताळ नगर, वानलेसवाडी, सांगली

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय