Sunday, May 19, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : आयुष्य - निशा केदारी लांडे

जनभूमी साहित्य : आयुष्य – निशा केदारी लांडे

प्रत्येकाला काही ना काही हवं असतं,

ज्याला ते मिळतं -तो खरचं खुप

     भाग्यवान असतो,

मनासारखं न मिळणाऱ्याला मात्र

     आयुष्य फक्त कुढत काढावं लागतं

पण त्या जगण्यातही एक सामर्थ्य असतं

 इतकं सहज आणि सुंदर नसतं

       स्वतःचा पराभव स्विकारायला

होते चिडचिड कधी कधी

        बरेच वेळा नैराश्य ही ग्रासतं

पण इथूनच मग सुरू होते एक कसोटी

      आपली क्षमता पडताळण्याची

आणि हेच ते आयुष्य असतं,

जे आपण जिद्दीने साकारण्याचा प्रयत्न करत असतो,

मनासारख्या गोष्टी घडवून आणण्यात

     एक लय प्राप्त होते

हीच तर खरी मज्जा असते,

     जिथं सारं काही संपलय अस वाटते

तिथंच नवीन आयुष्याची सुंदर

      सफर नुकतीच सुरू झाली असते !

….शब्दनिशा…

 – निशा केदारी – लांडे

– जुन्नर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय