Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्याउसतोड़नी,वाहतूक,मुकादम कामगारांच्या दरवाढीसह अन्य मागण्यासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन:- कॉ सुदाम शिंदे यांचा...

उसतोड़नी,वाहतूक,मुकादम कामगारांच्या दरवाढीसह अन्य मागण्यासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन:- कॉ सुदाम शिंदे यांचा इशारा

परळी वै(प्रतिनिधि) उसतोड़नी वाहतूक,मुकादम, क़ामगारांच्या दरवाढीसह अन्य मागण्यासाठी जिल्ह्यातील गावा गावत  सोमवारी होणाऱ्या निदर्शने आंदोलनात उसतोड़नी,वाहतूक,मुकादम कामगार यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आव्हान सीटू उसतोड़नी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे यांनी केले आहे.

 उसतोड़नी व वाहतूक मुकादम कामगारांचा दरात वाढ करून नवीन  त्रिपक्षीय करार करा,वाहतूकचे दर डिझल दरवाढी प्रमाणे करावे,तसेच मुकादमचे कमिशन 35% करावे उसतोड़नी कामगार महामंडळची अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यासाठी परळी तालुक्यातील सिरसाळा,मोहा,करेवाडी,गर्देवाड़ी, कावळेवाडी, मांडेखेल,माळ हिवरा,भिलेगाव,वाघाळा,बोधेगाव,इत्यादी गावातील ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयसमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे तरी  उसतोड़नी व वाहतूक मुकादम कामगार यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आव्हान कॉ अजय बुरांडे, कॉ सुदाम शिंदे,गंगाधर पोटभरे,मुरलीधर नागरगोजे,सखाराम शिंदे,विशाल देशमुख,विष्णुपंत देशमुख,मदन वाघमारे,पंडित शिंदे,विष्णु पोटभरे,बालाजी कडभाने,अशोक शेरकर,जय बनसोडे,बाबा शेरकर,यांच्यासह आदीने केले आहे..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय