Monday, July 15, 2024
Homeक्रीडाविश्वब्रेकिंग : IPL च्या 15 व्या सीजनचे वेळापत्रक जाहिर, जाणून घ्या कुठे...

ब्रेकिंग : IPL च्या 15 व्या सीजनचे वेळापत्रक जाहिर, जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने

Photo : IPL / Twitter

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2022 च्या सीजन 15 चे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. तर 29 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 15 वा हंगाम 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या सीझनमध्ये एकूण 70 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच, या सामन्याच्या आयोजनाचा मान हा महाराष्ट्राला मिळाला आहे. हे सामने मुंबई, नवी मुंबईसह पुणे शहरात होणार आहे. याबाबतची माहिती ट्विट करुन देण्यात आली आहे. 

या 70 सामन्या पैकी मुंबईत 55 आणि पुण्यात 15 सामने होणार आहेत. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. त्यामध्ये वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत. प्लेऑफ सामन्याचं ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आयपीएलच्या चौदाव्या सीझनची सुरुवात भारतामध्ये करण्यात आली होती परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ईतर सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र या वर्षी या संपूर्ण आयपीएलचे ठिकाण भारतामध्येच निश्चित करण्यात आलेले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय