Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सोसायटी पदाधिकाऱ्यांना संस्थात्मक मार्गदर्शन शिबिर, नगरसेवक एकनाथ पवार यांचा उपक्रम

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : स्मार्ट प्रभाग क्रं११ चे भाजप नेते, नगरसेवक एकनाथ पवार यांनी कृष्णानगर, घरकुल, शरदनगर, पूर्णानगर, शाहूनगर परिसरातील हौसिंग सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सोसायटी व्यस्थापन, कन्व्हेयन्स डीड, मालमत्ता हस्तांतरण, वारस नोंदणी, सोसायटी रजिस्ट्रेशन, सोसायटी व्यवस्थापन, विविध समस्या निवारण यासाठी  मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. ११२सोसायटी सह ४०० पेक्षाही अधिक नागरिक उपस्थित होते.

पूर्णानगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुल मध्ये महानगरपालिका व प्राधिकरण यांच्याशी निगडित बांधकाम विभागाचे मकरंद जी निकम,

भाजपा नेते व माहिती सल्लागार सारंग कामतेकर, सहा आयुक्त प्रशांत जोशी, प्राधिकरणाचे गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी महादेव कवितके, अजय पाताडे, पोपट हजारे, गोरख पाटील, संतोष ठाकूर, श्रीकांत कदम, बाळासाहेब गंगावणे, संदीप मांगवडे, नामदेव निकम, अनिकेत बाबर, सुदीप नायर, नामदेव पवार, भिमाजी पानमंद, मनीष चुदासमा, उद्धव शेळके, के.टी.पाटील, पंकज निकम, नर्सिंग धनजी, अश्विनी शिंदे, कविता हिंगे, धनश्री बेंडखळे, अर्चना पाटील, स्नेहा राजपूत, वैशाली खामकर यांच्या सह अनेक सोसायटी चेरमन नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles