Thursday, July 18, 2024
Homeजिल्हा'आदिवासींचेही डॉ . बाबासाहेब आंबेडकर' हा ग्रंथ दलित आदिवासींच्या नव्या अनुबंधाच्या भूमिकेचे...

‘आदिवासींचेही डॉ . बाबासाहेब आंबेडकर’ हा ग्रंथ दलित आदिवासींच्या नव्या अनुबंधाच्या भूमिकेचे उच्चारण करतो – डॉ.श्रीपाल सबनीस

पुणे : “स्त्रिया, ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त आणि मुस्लिम अशा सर्वच समाजघटकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधाननिष्ठ एकमय भारताच्या निर्माणाची मूल्यदृष्टी महत्वाची वाटते. व्यवस्थांतराच्या या पार्श्वभूमीवर डॉ . तुकाराम रोंगटे यांचा ‘आदिवासींचेही डॉ . बाबासाहेब आंबेडकर’ हा ग्रंथ दलित आदिवासींच्या नव्या अनुबंधाच्या भूमिकेचे उच्चारण करतो. “असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग व गोंदण क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासींचेही डॉ . बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन झाले. सर्वसमावेशक संविधा रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याभोवती कोणत्याही मर्यादित चौकटी आखणे उचित नाही हे डॉ. नितीन करमळकर यांनी याप्रसंगी बोलताना विशेषत्वाने अधोरेखित केले. 

आदिवासी समाजाचा व संस्कृतीचा प्रवाह आंबेडकरी कर्तृत्वाशी जुळवून घेण्याची संवादी भूमिका काळसुसंगत आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून दलित, आदिवासींसह सर्वच उपेक्षिताना मानवी हक्क व समतेची संधी मिळाली हे अनेक घटनाप्रसंगांच्या संदर्भासह असे डॉ. रोंगटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

‘आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ या ग्रंथावर डॉ . शमशुद्दीन तांबोळी, प्रो. शशिकला राय यांनी भाष्य केले. ग्रंथगत विषयाच्या अनुषंगाने आयोजित परिसंवादात डॉ. अनिल सपकाळ, डॉ . सुरेंद्र जोंधळे यांनी विचार मांडले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले. प्रकाशक अनिल पवळ यांनी आभार मानले. पुणे परिसरातील नागरिकांसह विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय