Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभाजपा राजवटीत महागाईचे थैमान, त्यात जीएसटीद्वारे होतोय लूटीचा डाव - सतीश काळे...

भाजपा राजवटीत महागाईचे थैमान, त्यात जीएसटीद्वारे होतोय लूटीचा डाव – सतीश काळे यांची टीका

पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ही दरवाढ कमी न केल्यास भविष्यात त्याविरुद्ध मोठा संघर्ष उभा राहील. भाजपाच्या राजवटीत आधीच महागाईने थैमान घातले आहे. त्यामध्येच आता जीएसटीत होणारी दरवाढ ही लुटीचा डाव असल्याची सणसणीत टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सतत वाढत आहे,सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा महागाई संपवू असे आश्‍वासन देणार्‍या भाजपा राजवटीने दिलेला नाही. नोटबंदी, जीएसटीच्या कठोर अंबाजवणीमूळे जनता हैराण झाली आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल शंभरी पार गेली आहे. बहुतेक लोकांचे हातावर पोट असते. त्यांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. सरकारने अन्नधान्य, डाळी, ब्रँडेड वस्तूवर 5 टक्के जीएसटी लावून पुन्हा महागाईचा मोठा झटका दिला आहे. सरकार जीएसटी द्वारे लूट करण्यासाठी फक्त वस्तू शोधत आहे.

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल आहे. सरकारने जीएसटी अमलबाजाणीची विद्यमान घोषणा मागे घ्यावी, असे सतीश काळे यांनी म्हटले आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा

ब्रेकिंग : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आता न्यायालयाने दिली ‘ही’ तारीख, आज सुप्रीम कोर्टात काय झाले पहा !

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सुचना

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होणार ?

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय