Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याgroup promoter : गटप्रवर्तकांच्या मानधनात अधिक वाढ करा – कृती समितीची मागणी

group promoter : गटप्रवर्तकांच्या मानधनात अधिक वाढ करा – कृती समितीची मागणी

मुंबई : गटप्रवर्तकांच्या (group promoter) मानधनात आशा स्वयंसेविकांच्या मानधनापेक्षा अधिक वाढ करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने गटप्रवर्तकांच्या (group promoter) मानधनात एक हजार रुपयांची वाढ करणारा शासन आदेश निर्गमित केला आहे. परंतु अत्यल्प वाढ केल्यामुळे गटप्रवर्तक नाराज आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक गेली पंधरा वर्षे काम करत आहेत.

महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून यापूर्वी दि. 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान संप केला होता. दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांनी 10 हजार रूपये अशी वाढ करण्याचे घोषित केले होते. परंतु केलेली वाढ अत्यल्प असल्याने गटप्रवर्तकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

त्यामुळे गटप्रवर्तकांच्या (group promoter) मानधनात आशा स्वयंसेविकांच्या मानधनापेक्षा अधिक वाढ करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटील, आनंदी अवघडे, राजू देसले, भगवान देशमुख, सुवर्णा कांबळे, पुष्पा पाटील, मंदा डोंगरे, रंजना गारोळे यांनी केली आहे.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय