Saturday, May 4, 2024
Homeशिक्षणपीएचडी मार्गदर्शकांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी घेऊन प्रवेश परीक्षेत संधी...

पीएचडी मार्गदर्शकांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी घेऊन प्रवेश परीक्षेत संधी द्या युवासेनेची मागणी

पुणे : ग्रंथालय व माहिती शास्त्र संशोधन केंद्रात मार्गदर्शकांची संख्या वाढवावी आणि राहिलेल्या सर्व पीएचडी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी घेऊन संधी द्यावी अशी मागणी युवासेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाने केली आहे.

युवासेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, पीएचडीचे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पीएचडी मार्गदर्शक विषयासंदर्भात तक्रार युवासेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाकडे प्राप्त झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने विद्यापीठ विभागातील संशोधन केंद्रात बाह्य मार्गदर्शकांना संशोधन मार्गदर्शक म्हणून सहयोगी होण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट करून संबंधित संशोधन केंद्राना मार्गदर्शकांची संख्या वाढविण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागातील पीएच.डी. मार्गदर्शकांची उपलब्धता सध्या नवीन प्राध्यापक भरती बंद असल्याने पुरेशा संख्येत नाही. त्यामुळे विद्यापीठ विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासंदर्भात येत असलेल्या अडीअडचणींचा विचार करून बाह्य मार्गदर्शक सहयोगी करून घेण्यासंदर्भात विचारविनिमय करून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार या सुचना देण्यात आल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे ग्रंथालय व माहिती शास्त्र विभाग व संशोधन केंद्रात पीएचडी मार्गदर्शकांची संख्या वाढवून उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी घेऊन प्रवेश परीक्षेत संधी देण्याच्या मागणीचे निवेदन प्रकुलगुरू उमराणी यांना देण्यात आले. यावेळी विद्यापीठ कक्षाचे कुणाल धनवडे, सरचिटणीस परमेश्वर लाड, उपाध्यक्ष विशाल हुलावळे, सहसचिव संतोष भोर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय