Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरआमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी समितीची बैठक

आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी समितीची बैठक


मनरेगा मॉडेल साठी आंबे ग्रामपंचायतीची निवड – आ. बेनके

जुन्नर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जुन्नर तालुका समितीची प्रथम बैठक आज (दि.20) पंचायत समिती जुन्नर येथे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वन विभागाचे वैभव काकडे, अजित शिंदे, जलसंपदा विभागाचे कडूसकर यांसह सर्व लाइन डिपार्टमेंटचे आधिकारी व जुन्नर तालुका रोजगार हमी समितीचे सदस्य उपस्थित होते.

जुन्नर : कुकडी च्या पाणीपट्टीसाठी ऑनलाईन प्रणालीची आवश्यकता

आमदार बेनके म्हणाले, मनरेगा अंतर्गत मागेल त्याला काम देण्यासाठी तत्पर रहावे. मनरेगा अंतर्गत पुढील 10 वर्षाचा कृती आराखडा तयार करून गावांमध्ये सातत्याने मनरेगाची कामे सुरू राहावीत तसेच मनरेगा मॉडेल साठी आंबे ग्रामपंचायतीची निवड करण्यात येत असल्याचे आ. बेनके म्हणाले.

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 264 जागांसाठी भरती

LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये

यावेळी रोजगार हमी सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. समिती सदस्य गणपत घोडे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत सेल्फवर जास्तीत जास्त कामे कशी घेता येतील यासाठी प्रयत्न करावेत.त्याच बरोबर ग्रामसेवक यांनी गावातच मजुरांचे मागणी अर्ज स्वीकारावेत, मजुरांना गावातच मागणी अर्ज उपलब्ध करून द्यावेत. मागणी अर्जाची पोच मजुरांना लगेच मिळावी. व सेल्फवार किमान सतत 5 कामे मंजूर असावीत अशी मागणीही यावेळी केली.

तसेच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये मनरेगाच्या कामांना किसान सभा व आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने सुरुवात झाली. त्याला प्रशासनाचा कमी अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु तरीही सुकाळवेढे, इंगळून, चावंड, खैरे, खटकाळे, देवळे या गावांतील लोकांची मागणी असूनही सेल्फवर कामे घेण्यास ग्रामसेवक, प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मजुरांना वेळेवर काम मिळू शकले नाही, असेही घोडे म्हणाले.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत होणार

सर्वच लाईन डिपार्टमेंटने स्वतः च्या सेल्फवार जास्तीत जास्त कामे व मजुर दिवस ठेवावेत. तसेच सर्व गावांमध्ये लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशा सुचना प्रांताधिकारी कोडोलकर यांनी दिल्या. तर  1 एप्रिल 2022 पासून मनरेगा वर काम करणाऱ्या मजुरास 256 रुपये मजुरी मिळणार आहे.मनरेगा अंतर्गत नवनवीन कामांचे उपक्रम तालुक्यात राबविण्याची संकल्पना तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी मांडली. 

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी म्हणाले, “मनरेगा समितीच्या प्रत्येक सदस्यांनी निकषात बसतील अशा किमान 50 गाई गोठ्यांसाठी लाभार्थ्यांची नावे सुचवावीत. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळेल.

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय