Friday, May 17, 2024
Homeराजकारणखासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली होती. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या मागच्या सुनावणीत राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

काय आहे पत्रा चाळ घोटाळा प्रकरण ?

पत्रा चाळ जमीन घोटाळा २००७ मध्ये सुरू झाला. हा घोटाळा प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसह महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा आरोप आहे. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. यामध्ये १०३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊतचा मित्र प्रवीण राऊत आरोपी आहे. बांधकाम कंपनीने चाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कंपनी प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. पत्रा चाळमध्ये तीन हजार फ्लॅट बांधले जाणार होते. चाळीतील रहिवाशांना ६७२ फ्लॅट मिळणार होते. खासगी बिल्डरांना जमीन विकल्याचा आरोप आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय