Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणशेतकऱ्यांना कृषी अनुदान वाढवून द्या - राजेंद्र पाडवी

शेतकऱ्यांना कृषी अनुदान वाढवून द्या – राजेंद्र पाडवी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

तळोदा : कृषी अनुदान वाढवून देण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार, कृषी अधिकारी नंदुरबार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पाडवी म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भीडले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे भाव सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. राज्य शासनाकडून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी महाडीबीटी या पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड करून अनुदान दिले जाते. मात्र शासनाकडून मिळणारे कृषी अनुदान तुटपुंजे असल्याने ते अत्यंत कमी आहे. मात्र एकीकडे शेतकऱ्यांना लागणारे साहित्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वाढत्या महागाईमूळे सदर लाभार्थी शेतीला लागणारे कृषी साहीत्य खरीदी करू शकत नाही.

अनेक तालुक्यातील शेती सिंचनाच्या सुविधा नसल्याने वरच्या पावसाच्या पाण्यावरच शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती योजनांसाठी मिळणारे अनुदान अत्यंत कमी असल्याने ते त्यांना परवडणारे नाही. जगात व देशात कोरोना या महामारीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे अनेक लोकांना व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. या वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे महाडीबीटी या पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड करून दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांपासून अनेक शेतकरी वंचित राहत आहे, असेही म्हटले आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय