Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरगावातील विकासकामाचे महिलांच्या हस्ते उद्घाटन, ग्रामपंचायतीचा अनोखा कार्यक्रम

गावातील विकासकामाचे महिलांच्या हस्ते उद्घाटन, ग्रामपंचायतीचा अनोखा कार्यक्रम

जुन्नर : ग्रामपंचायत खामगावने एक आदर्श निर्माण करत महिलांच्या हातात टिकाव व नारळ देत स्मशानभूीतील महिलांच्या सभामंडपाचे महिलांच्याच हस्ते उद्घाटन केले.

गावातील मागील एका दशक्रियेत आमदार बेनके स्वतः आलेले होते व त्यावेळेस महिला या उन्हात बसलेल्या पाहून त्यांनी अजिंक्य घोलप यांना बोलवून घेऊन कामासाठी निधी उपलब्ध करून दिला व सदर शेडचे उद्घाटन हे महिलांच्याच हस्ते व्हावे अशी सूचना यावेळी त्यांनी केली होती.

त्या अनुषंगाने आज “चूल आणि मुल” या उक्तीच्या पलीकडे जावून आमदार बेनके यांच्या सूचनेनुसार गावातील महिलांना सामाजिक स्तरावर मान व सन्मान मिळावा यासाठी अशा पद्धतीने अनोखे उद्घाटन केले असल्याची माहिती उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी दिली. महिलांनी देखील यावेळी समाधान व आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमातून समाजात वेगळा संदेश गेला असून सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होत आहे.

आदिवासी विभागातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणाऱ्या खामगाव ग्रामपंचायत मधे विविध विकास कामे प्रगती पथावर आहेत. अशातच वैकुंठधाम स्मशानभूमी येथे तालुक्याचे आमदार अतुल बेनके व राष्ट्रवादी चे नेते भाऊ देवाडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नियोजित आराखड्या नुसार निधी उपलब्ध करण्याचे काम उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी केले.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय