मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचे साहित्य हे उपेक्षित माणसाच्या भावना व्यक्त करणारे होते. अन्यायाची जाणीव करुन देणे व त्याविरुद्ध लढा उभारणे हीच अण्णा भाऊ साठे यांनी समाजाला शिकवण दिली आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेच्या उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी चारोळी ही म्हणली “वाटेत कितीही येऊ द्या काटे, आमच्या पाठीशी आहेत अण्णा भाऊ साठे“ या कविताला लोकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री व महायुती सरकारचे मातंग समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले. आर्टीच्या स्थापनेमुळे राज्यात मातंग समाजाचे आयएएस तसेच विविध क्षेत्रात आता अधिकारी मोठ्या प्रमाणात होतील असा विश्वास व्यक्त केला. आजच आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार माहाराष्ट्र राज्यात लवकरच अनुसूचीत जातीचे अ ब क ड असे वर्गीकरण करण्याची मागणी ही गोरखे यांनी यावेळी केली.
2003 मध्ये लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी फाईलीच्या ओझ्याखाली धुळ खात पडली होती. मी ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तेव्हा त्या फाईलमध्ये असलेल्या शिफारशीचा अभ्यास करण्यात आला. आज आर्टीच्या निर्मितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आज सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन करुन लवकरात लवकर राहिलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करता येईल, असे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
महायुती सरकार हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी काम करीत असून येत्या निवडणुकीत आपण सर्वांनी महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबई साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवरच्या उपस्थितीत यावेळी मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद सदस्य मातंग समाजाचे युवा नेते अमित गोरखे हेदेखील उपस्थित होते.
राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्यात करण्यात आली असून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाचे तसेच विविध योजनांअंतर्गत कर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच आर्टी संस्थेच्या वेबपोर्टलचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी प्रेरित करणे हे काम अण्णाभाऊंनी आम्हाला समर्थ लेखणी आणि ओघवत्या वाणीतून करून दाखवले. त्यांच्याच मार्गावर चालणारे हे
सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्याच माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देणाऱ्या अनेक योजना आम्ही तयार केल्या आहेत. त्याचे लाभ लोकांना मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
Annabhau Sathe
या प्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, मातंग समाजाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र म्हणजेच (आर्टी)ची स्थापना तसेच अनुसूचित जातीचे अ.ब.क.ड. वर्गीकरण करणे नितांत गरजेचे होते आणि आज सुप्रीम कोर्टाने देखील अण्णाभाऊंच्या जयंतीच्या दिवशीच आरक्षण उपवर्ग वर्गीकरण कारणाचा निर्णय जाहीर केला यामुळे मातंग समाजाला आता सर्वांगीण विकास तसेच स्वतंत्र आरक्षण मिळेल असे सांगितले त्याचप्रमाणे मातंग समाजासाठी राज्य शासनाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली असून यासाठी जास्तीत जास्त निधी महामंडळाला देण्यासाठी सातत्याने पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केलेला असून मातंग समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचीही आमदार अमित गोरखे यांनी सांगितले
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, महा व्यवस्थापक अनिल मस्के निबंधक इंदिरा आस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू