पुणे (प्रतिनिधी) : उन्हाळी सुटीचे निमित्त साधत कै. सौ. राजश्रीताई आंदेकर फाउंडेशन आणि लोकायत नागरी समिती यांच्यातर्फे वस्तीतील मुला-मुलींसाठी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. शनिवार, 13 मे रोजी सायं 4:30 ते 8:30 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबीरात वस्तीतील जवळपास 60 मुला-मुलींनी भाग घेतला होता. विज्ञान प्रयोग, ओरिगामी , हस्तकला, सामूहिक शरीरशिल्प बनवणे पासून गाणी, विज्ञान कोडी व मजेदार खेळ इथपर्यंत विविध उपक्रमात मुलांनी भाग घेतला.
मुलांनी नवनवीन गोष्टी करून पाहाव्यात , त्यांच्यामध्ये विज्ञान व विविध गोष्टींविषयी कुतूहल वाढावे, त्यांच्यातल्या गुणांना वाव मिळावा, त्यांना आनंद मिळावा आणि त्या अनुषंगाने चर्चा आणि गप्पांद्वारे मूल्यशिक्षण घडावे. हा उद्देश डोळ्यासामोर ठेवून कै. सौ. राजश्रीताई आंदेकर फाउंडेशनचे आणि नगरसेवक श्री. वनराज आंदेकर यांच्या पुढाकाराने या मोफत शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्याकडून सर्व सहभागी मुला-मुलींना चित्रकलेचे साहित्य आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
शिबीरातील विविध उपक्रम लोकायत नागरी समितीच्या मोनाली चंद्रकांत अपर्णा, योगेश लक्ष्मण मंजुळा व इतर कार्यकर्त्यांनी घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश नलावडे, अविनाश उपलांची, राकेश नामेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.