Monday, May 6, 2024
Homeजिल्हा"नुपूर शर्माला औरंगाबादच्या चौकात फाशी देण्यात यावी "- इम्तियाज जलील

“नुपूर शर्माला औरंगाबादच्या चौकात फाशी देण्यात यावी “- इम्तियाज जलील

 पुणे : प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेलं वक्तव्यांमुळे चांगलाच वाद पेटलाय. देशभरात नुपूर शर्माच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत.१० जून रोजी देशातील अनेक भागात या निदर्शनांना हिंसक वळण लागले.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

पण महाराष्ट्रात निदर्शना दरम्यान कसलाही हिंसाचार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर AIMIM खासदार इम्तियाज जलिल यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्या विरोधात औरंगाबाद शहरात AIMIM च्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन नुपूर शर्माच्या विरोधात घोषणाबाजी केली.या आंदोलना दरम्यान जलील यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी बोलताना नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्यामुळे “तिला चौकात फाशी देण्यात यावी” अशी मागणी जलील यांनी केली आहे.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

“इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. यामुळे नुपूर शर्मानं केलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग तयार झाला आहे. यासाठी नुपूर शर्मावर कारवाई झाली पाहिजे. जर कोणीही आपल्या धर्माविषयी असं वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कायदा तयार केला जावा. फक्त पक्षातून काढून टाकलं म्हणजे कारवाई झाली असं अजिबात नाहीये. यामुळे नुपूर शर्माला फाशीची शिक्षा देण्यात यावी.” अशी मागणी जलील यांनी केलीय.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय