मावळमधील आदिवासी कुटुंबाना एक हात मदतीचा, ‘वुई टूगेदर फाउंडेशन’चा उपक्रम
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मावळ तालुक्यातील कुसवली येथील आदिवासी कातकरी कुटुंबाना संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट व वुई टूगेदर फाउंडेशन या पिंपरी चिंचवड शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीने पावसाळ्यात दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक किराणा, औषधे, सॅनिटरी पॅडस, शालेय स्टेशनरी, सायकल्स चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा सीताताई केंद्रे प्रमुख पाहुण्या होत्या. पावसाळ्यात आदिवासी कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी त्यांनी 32 किराणा किट व रेशन उपलब्ध करून दिले.
आदिवासी कुटुंबाच्यापुनर्वसनासाठी वस्ती दत्तक योजना राबवू – सीता ताई केंद्रे
सरकारच्या विविध विकास योजनांपासून अद्यापही येथील आदिवासी वंचित आहेत. मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या भूमिहीन आदिवासी कातकरी बंधूना पावसाळ्यात अतिशय हलाखीचे जीवन जगावे लागते. पावसाळ्यात आजार वाढतात, खाण्या पिण्याची आबाळ होते. या दुर्गम भागातील मुलांमुलींना पिंपरी चिंचवड शहरातील शैक्षणिक सुविधा मिळवून देऊ. जिल्हापरिषद व आदिवासी विकास योजना विभाग व सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून या गरीबांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या लाभापासून वंचित राहिल्याची कारणे व इतर समस्या शोधण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी संपूर्ण वस्तीचे संपूर्ण सर्वेक्षण करून पुनर्वसन योजना राबवावी लागेल. वस्ती दत्तक योजने साठी तोपर्यंत आर्थिक, शैक्षणिक व वस्तुरूपी मदत आम्ही करत राहू, असे सामाजिक कार्यकर्त्या व संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा सीता ताई केंद्रे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या वतीने प्रथमोपचार साहित्य, गोळ्या, औषधे, सॅनिटरी पॅड, सिरप किट वितरण डॉ.प्रतिभा कुळकर्णी यांचे हस्ते चंद्रकांत खांडभोर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी ‘पावसाळ्यातील आजार व प्रथमोपचार’ यावर आरोग्यसल्ला देताना डॉ.प्रतिभा कुळकर्णी यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या काळात या दुर्गम भागात संपर्क तुटतो. कोणतीही सर्वसाधारण किंवा वैद्यकीय मदत पोचवणे शक्य नसते. आदिवासी बंधू भगिनींनी या काळात पावसाचे किंवा ओढानाल्याचे पाणी पिऊ नये, पाणी उकळून प्यावे, त्यामुळे उलट्या, जुलाब, कावीळ यासारखे गंभीर आजार होणार नाहीत. येथील स्वयंसेवकांनी प्रथमोपचार साहित्य गोळ्या औषधे योग्यवेळी देऊन येथे आरोग्यसेवा करावी.
चिखली येथील उद्योजक दत्तात्रय शेटे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सायकल्स दान केल्या, त्याचेही वितरण करण्यात आले. कुसवली येथील आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना रविंद्र इंगळे यांनी शालेय स्टेशनरी दिली. येथील 32 कुटुंबाना किराणा, औषधे व सॅनिटरी पॅड देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील दानशूर नागरिकांनी मोठे योगदान दिले होते.
संस्थेचे श्रीरंग दाते, शंकरराव कुलकर्णी, जयवंत कुलकर्णी, डॉ.प्रतिभा कुलकर्णी, डॉ.निशिकांत कुलकर्णी, अनिल शिंदे, लता शिंदे, रंगाराव, रोहित वैद्य, रविंद्र शेटे, संजय काळे, वसंत अजबे, विश्वास दाते, कविता काळे, विनय फाटक, महादेव देशमुख, श्रीकांत गोंदकर, वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, मधुकर बच्चे, दुसाने, रुपाली भस्मे, रविंद्र काळे, एम के शेख, गुरुराज फडणीस, दिलीप चक्रे, सदाशिव बर्वे, सुशील रावण, सदाशिव गुरव, वासुदेव काळसेकर, सौ जयवंत कुलकर्णी, वैद्य, बळवंत दिक्षित, सचिन कांबळे, शशिकांत सोळंकी, गणपत हेमाडे, राजू सुतार, कृष्णा ननावरे, सुनील कोल्हे, महेश पोळ यांनी आदिवासी सक्षमीकरण केंद्राला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
वुई टूगेदर फाउंडेशनचे जनसंपर्क प्रभारी श्रीनिवास जोशी यांनी प्रास्तविक सूत्रसंचालन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील उपेक्षित, वंचित लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही शहरातील नागरिक तन, मन, धन द्यायला तयार आहोत. येथील तरुण होतकरू मुलामुलींनी शिकावं, त्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे सांगितले. अध्यक्ष सलीम सय्यद यांनी उपस्थिताना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत खांडभोर, योगेश गोंठे, शैलजा कडुलकर, माया सांगवे, रुकसाना काझी, दिलीप पेटकर, संजय कटोळकर, दत्ता सांगवे, विशाल पेटारे, रत्नदीप सरोदे, क्रांतिकुमार कडुलकर यांनी केले.
हे ही वाचा :
‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका
ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल
मुबारक भाई पठाण ठरले महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार
Heat wave : संपूर्ण देशात उष्णतेचा कहर, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेत 44 ठार
नोकरीच्या बातम्या वाचा :
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे टपाल जीवन विमा अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती