Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणवातावरणाचा आंबा फळपिकावर परिणाम, शेतकर्‍यांचे नुकसान

वातावरणाचा आंबा फळपिकावर परिणाम, शेतकर्‍यांचे नुकसान

जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील राळेगण, शिंदे, बोतार्डे, येणेरे, बेलसर, काले या भागातील आंबा फळपिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस, ढगाळ व दमट वातावरण झाल्याने आंब्याला आलेला मोहोर या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात झडून गेला, वास्तविक याच बहरलेल्या मोहोराला पुढे आलेली कैरीदेखील यामुळे खराब होऊन गळून गेली. खरं तर सध्या झाडांना दुबार आंबा आलेला दिसत आहे. सुरूवातीच्या मोहोराचे आंबे मोठे झालेले असून नंतरच्या मोहोराचे आंबे हे छोटे आले आहेत यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे.

जुन्नरच्या पश्चिम भागातील आंबा फळपिकांतून लाखोंचं उत्पन्न घेतलं जातं. मात्र यावेळी आंब्याच्या झाडांना तुरळक आंबे असल्याने बाजारपेठेत आंब्याला मागणीदेखील तितकीच असल्याने परिणाम थेट आर्थिक बाजूने होत असलेला दिसत आहे. मात्र, वातावरण चांगले नसल्याने आंबा फळपिकांवर या गोष्टीचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय