Saturday, May 18, 2024
Homeराज्यGUJARAT STORY : भाजपला केरळची चिंता-गुजरातमध्ये काय चालले आहे ?

GUJARAT STORY : भाजपला केरळची चिंता-गुजरातमध्ये काय चालले आहे ?

अहमदाबाद / क्रांतिकुमार कडुलकर : कर्नाटकात केरला स्टोरी चित्रपटाचा निवडणूक प्रचारात उल्लेख करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्य गुजरात मधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ हजाराहून जास्त मुली महिला बेपत्ता झाल्याची माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा (NCB)’ च्या अहवालातून समोर आली आहे.

वर्ष २०१६ मध्ये ७ हजार १०५, वर्ष २०१७ मध्ये ७ हजार ७१२, वर्ष २०१८ मध्ये ९ हजार २४६, वर्ष २०१९ मध्ये ९ हजार २६८, तर वर्ष २०२० मध्ये ८ हजार २९० मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीत अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असल्यामुळे ही बातमी खूप मोठी मानली जात आहे, गुजरातमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे.

गुजरात सरकारने २०२१ मध्ये विधानसभेत दिलेल्या निवेदनानुसार, अहमदाबाद आणि बडोदा येथे अवघ्या एका वर्षात (२०१९-२०२०) ४७७२ महिला बेपत्ता झाल्या आहेत. २०१८ मध्ये, राज्य सरकारने कबूल केले की गेल्या दोन वर्षांत राज्यातील १४००४ महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. तथापि, यापैकी सुमारे ७६ टक्के याच काळात सापडल्या देखील होत्या. त्या वर्षांत, दररोज १८ महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अहमदाबाद आणि सुरतमध्ये सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय