Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यSalt : जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध...

Salt : जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा! 

Disadvantages of Salt : जेवणात मीठाला खूपच अधिक महत्त्व आहे. कारण त्याच्या शिवाय जेवणाला चवच येऊ शकत नाही. त्यामुळेच मीठ किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येऊ शकतो. पण तुम्हाला माहितीये का? मीठाचे अधिक सेवन आपल्यासाठी किती घातक ठरु शकते.

यकृत, हृदय आणि थायरॉईड सारख्या अनेक अवयवांच्या सुरळीत कार्यासाठी मीठ आवश्यक आहे. पण त्याचा अतिरेक झाला की हेच मीठ आपल्या मृत्यूचे कारण पण बनू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते. अनेक लोकं जेवणात वरुन मीठ टाकून खातात. अशा लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होऊ शकतो. ज्यामुळे शेवटी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मिठाच्या अतिवापरामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. 

तसेच मीठाचे अधिक सेवन केल्याने खाज येण्यापासून ते त्वचेवर जळजळ होणे, लाल पुरळ येणे, केस गळण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. पण जर तुम्हाला देखील केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही मीठाचे सेवन कमी केले पाहिजे. यामध्ये जास्त सोडियम आहे. ज्यामुळे केसांची मुळे जास्त कमकुवत होतात.

जर तुम्ही मीठ अधिक प्रमाणात खालले तर तुम्हाला हाडांमध्ये असलेले कॅल्शियम हळूहळू कमी होण्याची समस्या जाणवते. मीठामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि नंतर ही कमकुवतपणा ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारात बदलते. तसेच जास्त मीठ खाल्ले तर आपल्याला अधिक घाम येतो. किंवा लघवीतून देखील जास्त पाणी जावू शकते. यामुळे आपल्या किडनीला अधिक काम करावे लागते. यामुळेच किडनीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराच्या लोकांना देखील मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय