Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबेकायदेशीर दुचाकी वाहतूक न थांबल्यास आझाद मैदानावर तीव्र निदर्शने करू – बाबा...

बेकायदेशीर दुचाकी वाहतूक न थांबल्यास आझाद मैदानावर तीव्र निदर्शने करू – बाबा कांबळे

रिक्षा चालक, मालकांचा केएसबी चौक ते आरटीओ पर्यंत रिक्षासह मोर्चा

बेकादेशीर टू व्हिलर बाईक कंपनी विरोधामध्ये कारवाई करण्याचे आरटीओ चे आश्वासन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: सरकारने गरिबांमध्ये भांडण लावण्याचे काम बंद केले आहे. बेकायदेशीर वाहतूक बंद करणे गरजेचे आहे. रिक्षा व्यवसाय अडचणी मध्ये आला आहे. आमच्याकडे लायसन आहे. बॅच आहे आणि परवाना आहे. परंतु लायसन बॅच, परवाना नसताना दुचाकी मधून अत्यंत चुकीच्या व धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. हे थांबले पाहिजे. अन्यथा मुंबई मध्ये आझाद मैदानात रिक्षा चालकांसह आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

छत्रपती शाहू महाराजांच्या केएसबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. केसरी चौक ते आरटीओ पर्यंत रिक्षासह मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी बाबा कांबळे बोलत होते.

यावेळी घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, संतोष गुंड, पप्पू गवारे, हिरामण गवारे, संजय दौंडकर, अनिल शिरसाट, जाफर शेख, रवींद्र लंके, प्रदीप आयर, सिद्धार्थ साबळे, अफरोज कोतवाल, जयराम शिंदे, धनंजय कुदळे, गणपत कांबळे, गणेश गाढवे, अजय साळवे, अविनाश जोगदंड, तुषार लोंढे, योगेश जाधव, सुरज सोनवणे, समीर इनामदार, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार आहे. बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. ही कारवाई बंद करावी. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचे रखडले आहे. त्याला मूर्त स्वरूप द्यावे. रिक्षा चालकांना सीएनजीसाठी केंद्राने २५ टक्के व राज्याने 25 टक्के असे 50 टक्के अनुदान द्यावे. रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना सुरू करावी.मुक्त परवाना बंद करा, या मागण्यासाठी खासगी वाहतूक कंपन्यांनी वाहतुकीबद्दल उच्च न्यायालयाची फसवणूक करत ॲप सुरू केले आहे. उच्च न्यायालयाचा अवमान आहे. या प्रकरणी कंपन्यावरती एफआर दाखल झाला पाहिजे.

यावेळी दोन दिवसात बेकादेशीर वाहतूक करणाऱ्या कंपन्यावरती कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, श्री. ओतारी, श्री. आव्हाड, यांनी दिले. या वेळी रिक्षा चालक, मालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय