Ramdas Athawale : लोकसभा निवडणुकीची निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे इतर एनडीएतील सहकारी पक्षांच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन करावे लागणार आहे. दरम्यान, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपकडे आपल्या मागण्यांची यादी वाचण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही मागणी करताना आखडता हात घेतलेला नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत.
काय म्हणाले Ramdas Athawale ?
“महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला. यावेळी मला कॅबिनेट मंत्री मिळाले पाहिजे. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सध्या सरकारही बनलेले नाही. मात्र, मंत्रिपदावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणते मंत्रालय हवे? यावरुनही मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत. एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सध्या 240 सीट आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे 16, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 7 जागा आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) कडे 5 जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापन केल्यानंतर कोणाला किती जागा मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आघाडी आणि मित्र पक्षांची जुळवाजुळव करण्यामध्ये लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत. आणि अशातच विविध राज्यांमधील खासदारांची मूठ बांधून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी एनडीए सज्ज आहे. रामदास आठवलेंनी केलेल्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : शेअर मार्केट मध्ये तब्बल ३० लाख कोटींचा घोटाळा
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !