Monsoon : नैऋत्य मान्सून येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. Monsoon news
आतुरतेने वाटत पाहत असलेल्या मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे ६ जून रोजी राज्यात आगमन झाले झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. कोकणातील बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मान्सूनचा अरबी सागरातून प्रवेश कर्नाटकात दक्षिणेकडून दाखल झाला आणि त्याने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूरचा काही भाग व्यापला आहे. पुणे शहरात पुन्हा येत्या काही दिवसांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. Monsoon rain
याआधी 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि 48 तासात कोकणात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी मान्सूनपुर्व पडलेल्या पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने राज्यातील काही भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज बेंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कर्नाटकात पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे MET ने अहवालात म्हटले आहे.
मान्सून कर्नाटकात नेहमीपेक्षा चार दिवस आधीच दाखल झाला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 24 तासांत बेलगावी, कलबुर्गी, विजयापूर, यादगिरी, चामराजनगर, कोलार, म्हैसूर, रामनगरा, तुमकूरसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार