Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलोणावळ्यातील लोहगडावर भीषण गर्दी; चेंगराचेंगरीत चार तास पर्यटक अडकले

लोणावळ्यातील लोहगडावर भीषण गर्दी; चेंगराचेंगरीत चार तास पर्यटक अडकले

पुणे : लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटक अडकून बसले होते. रविवार असल्याने गडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशः पाऊल ठेवायला जागा देखील नसल्याचं एका व्हिडिओ मधून समोर आलेले आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही. असंच चित्र दरवर्षी बघायला मिळतं गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर पोलीस देखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे.

लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये छोटे- मोठे धबधबे वाहू लागले आहेत. रविवारी वीकेंड असल्याने पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडयासह पुणे जिल्ह्यातील पर्यटक वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी आल्याचे बघायला मिळालं. लोहगडावरती प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होतं. पर्यटकांना बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. तब्बल चार तास पर्यटकांना अडकून बसावं लागलं अशी परिस्थिती गडावरती निर्माण झाली.

पाय ठेवायला देखील जागा शोधून सापडत नव्हती. अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली आले. असेच चित्र दरवर्षी लोहगडावरती बघायला मिळतं. नियोजनाचा अभाव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला असून लोणावळा शहर असेल किंवा ग्रामीण पोलिस असेल यांनी अशा घटनांकडे लक्ष देण्याचं गरज आहे. अन्यथा चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव देखील जाऊ शकतो. पर्यटकांनी देखील शहाणपण दाखवण्याची गरज आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : जयंत पाटलांना हटवलं, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड

मोठी बातमी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘आम्ही अजितदादांबरोबर…’, बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

मोठी बातमी : अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भुमिका, म्हणाले…

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय