Tuesday, May 21, 2024
HomeNewsआळंदीत माता रमाई जयंती दिनी महिलांचा सन्मान

आळंदीत माता रमाई जयंती दिनी महिलांचा सन्मान

आळंदी/अर्जुन मेदनकर: महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सलग्न, पथारी सुरक्षा दल आळंदी शहर आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक बहुउद्देशीय ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भाजी मंडई शाखेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन, दीप पूजन करण्यात आले. माता रमाईच्या जयंती निमित्त ज्या महिलांनी आपला संसार सांभाळून समाजात एक वेगळा ठसा उमटविला अशा विविध क्षेत्रातील कार्यरत महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.

यात विविध क्षेत्रात कार्यरत अधिकारी,डॉक्टर्स, शासकीय कर्मचारी आदी क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश होता. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, आळंदी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख शितल जाधव, पथारी धोरण आणि बालकल्याण विभाग प्रमुख पाटील ,संगणक अभियंता आरती पाटील, भांडार विभाग प्रमुख अर्चना पवार, मुकादम मालन पाटोळे, आशा जगताप, सोनाली रत्नपारखी, निशा पोटघरे, ज्योती पटेकर आदींचा समावेश होता.



कार्यक्रमाचे संयोजन संतोष सोनवणे, निलम सोनवणे,गणेश काळे,भानुदास मदने,गणेश मुंजाळ,बाळासाहेब जाधव, भीमाशंकर गळेकाटु,गजानन मिटकरी, गोरक्षनाथ खांडे, इम्तियाज शेख, प्रज्योत सानप, निलेश ढोकणे, संतोष बवले, राहुल रायबोले, विठ्ठल तिडके, भगवान दराडे, रितेश नितनवरे, विशंभर गायकवाड, दिलीप काळे, आजबे महाराज, विठ्ठल गोळेकर, मनोहर धनगर, सुभाष शिरसाट, नवनाथ बोडरे, संतोष थोरवे, मुरलीधर शिनगारे, भाजी मंडई महिला आघाडी अश्विनी जाधव, सुनिता काळे, कल्याणी बवले, सीमा मिटकरी, रुक्मिणी तिडके, रंजना गायकवाड, सोनाली पोहरे, प्रियंका मुंजाळ, सारिका खांडे, पल्लवी धनगर, सुलोचना ढोकणे, सुनिता साळुंखे, राणी सानप, संगीता गायकवाड, चामा गायकवाड, रूपाली मुंडे, सपना येलकर, अश्विनी हनुमंते, उज्वला माने, वर्षा काकडे, वनमाला शिरसाट, मीरा गव्हाणे, सिंधू चव्हाण, आशा अंकले, काजल धोंडगे, मनीषा बोडरे, चिंतादेवी गुप्ता, शितल शेलार आदींनी केले. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून महिला पदाधिकारी तसेच भागवत काटकर, अर्जुन मेदनकर यांचेसह उपस्थि9तांचे हस्ते अभिवादन करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय