Saturday, May 18, 2024
Homeराजकारणजालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागितली जाहीर माफी

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागितली जाहीर माफी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या जालन्यातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यासोबतच अश्रूधुराचा प्रयोग झाला. या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले असून या वादावर पडदा टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर मागितली आहे.

जालन्यात सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे शांततेत असलेले आंदोलक चिडले आणि संबंध मराहाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टिका झाली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली.

आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रथम देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतिनं सकल मराठा आंदोलकांची माफी मागितली. मात्र त्याचवेळी राजीनामा मागणाऱ्यांना उत्तर दिलं. मात्र असं करताना त्यांनी मावळ मधील शेतकरी आंदोलनाचा स्पष्ट उल्लेख करत सवाल उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या घटनेचे राजकारण होणे हे योग्य नाही. जाणीवपूर्वक लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले असा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की एसपी, डीवायएसपींना लाठीमाराचे अधिकार असतात. मग माझा सवाल आहे निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले, तेव्हा मंत्रालयातून आदेश आला होता का? मावळला शेतकरी जेव्हा गोळीबारात म़त्यूमुखी पडले तेव्हा ते आदेश कोणी दिले? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? मग त्यांनी राजीनामा का दिला नाही? असे प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय