Sunday, May 5, 2024
Homeराज्यखूशखबर : राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

खूशखबर : राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावासाने दडी मारली असून राज्यातील अनेक ठिकाणी दुश्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिके देखील वाळत असल्याचे समोर येत आहे, अशात आता समाधानकारक बातमी येत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्याने राज्यात मान्सून पूर्णतः सक्रिय होत आहे. आजपासून दि.५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ‘X’ वरून (पूर्वीचे ट्विटर) वरून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भाला 6 ते 8 हे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 5 ते 8 पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात 6 ते 8 ऑरेंज, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थान, पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर हा भाग वगळता संपूर्ण देशाला 5 ते 8 सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यांत प्रामुख्याने पावसाचा जोर राहणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय