Friday, May 3, 2024
Homeराजकारण‘त्या’ दोन गुन्ह्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार ? 8 सप्टेंबर रोजी...

‘त्या’ दोन गुन्ह्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार ? 8 सप्टेंबर रोजी न्यायालय देणार निकाल

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमुळे अडचणीत आले आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील दोन गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नव्हती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्हे नमूद न केल्याप्रकरणी न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी या संदर्भात निकाल सुनावू शकतात. या प्रकरणाचा निकाल आज (5 सप्टेंबर) सुनावला जाणार होता. मात्र आता न्यायालयाने 8 सप्टेंबर तारीख दिली आहे. त्यामुळे निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिला गुन्हा बदनामीच्या गुन्ह्यासंदर्भातील (क्रिमिनल डिफेमेशन) संबंधित आहे. तर दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी आंदोलन करतानाचे आहे. एका जागेवर असलेल्या झोपडपट्टीला मालमत्ता कर लावण्यात यावा, असे पत्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर लावला. ती जमीन खाजगी असून आपल्या मालकीची आहे, अशी खाजगी अशी खाजगी तक्रार एका व्यक्तीने केली होती. पुढे ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली.

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय