Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडHeat wave : संपूर्ण देशात उष्णतेचा कहर, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेत 44 ठार

Heat wave : संपूर्ण देशात उष्णतेचा कहर, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेत 44 ठार

सर्व शाळा बंद करण्याचे आदेश

पटना :
संपूर्ण देशात उष्णतेचा कहर सुरू झाला आहे, उत्तर भारत, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह विविध राज्यात दिवसा व रात्री उष्णतेचे वारे वाहत आहेत. बिहारमध्ये अतिउच्च तापमान व उष्णतेच्या वाऱ्यामुळे 44 लोक मृत्युमुखी पडले आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथे खात्याने कमाल 44.7 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे.

‘अत्यंत उष्णतेची लाट’ असा अलर्ट औरंगाबाद, रोहतास, भोजपूर, बक्सर, कैमूर आणि अरवाल जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पाटणा, बेगुसराय, खगरिया, नालंदा, बांका, शेखपुरा, जमुई आणि लखीसरायसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यत्वे वयाची साठी उलटले रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

बिहारमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाने इयत्ता 12 वी पर्यंतच्या उन्हाळ्याच्या सुट्या वाढवल्या असून आता सर्व शाळा 24 जूनपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी लोकचळवळ उभारणार – महेश बारणे


अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा

रे नगर च्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर मध्ये हस्तांतरण – नरसय्या आडम मास्तर

संबंधित लेख

लोकप्रिय