Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडहृदयी प्रीत जागवणारी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन !

हृदयी प्रीत जागवणारी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन !

मुंबई : जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे मुंबई येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते.

गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा, दिग्दर्शक अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे येथे राहत होत्या. सीमा देव यांचा जन्म २७ मार्च १९४२ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. त्यांचे बालपण मुंबई येथील गिरगाव परिसरात गेले. तेथेच राममोहन इंग्लिश स्कूलमधून त्यांनी इयत्ता ९वीपर्यंतचे शिक्षण घेतले. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातून समूहनृत्यामध्ये नृत्य करणार्‍या नलिनी सराफ यांनी कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

‘आलिया भोगासी’ हा नलिनी सराफ यांचा पहिला चित्रपट. यात त्यांचे सहकलावंत होते रमेश देव. रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली.

१९५७ सालच्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, , ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लक्षात राहीली आहे.

राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा, हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता, पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते, लाजुनी मनोमनी, उगिच धुंद राहते, या गाण्या ने त्यांची ओळख आजही सुपरिचित आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय