अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांना या वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी जेलने त्यांचा तुरुंगातील फोटो प्रसिद्ध केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चार वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले असून वकिलांनी 45 पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी तुरुंगासमोर ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केले आहे.
ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र, आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांतच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 4 आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये 1- युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, 2- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, 3- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे. 4- हक्कांविरुद्ध कट करणे असे आरोप आहेत.