Friday, November 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने चिंचवड येथे आरोग्य शिबीर

PCMC:विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने चिंचवड येथे आरोग्य शिबीर



PCMC:विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने चिंचवड येथे आरोग्य शिबीर

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने आरोग्य तपासणी,आभाकार्ड,5 लाखपर्यंतचा विमा,आयुष्मान कार्ड,पी एम् स्वानिधी कर्ज योजना,आधार कार्ड,विविध कल्याणकारी योजना,महिला बचत गट नोंदणी व प्रमाणपत्र वाटप आदी योजना केशवनगर प्रभाग 18 चिंचवड मधील प्रभागातील नागरिकांसाठी मोरया गोसावी क्रिडांगणावर एक दिवशीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.


नागरिकांनी या उपक्रमातील विविध योजनांचा मोठा फायदा घेतला.अत्यंत महत्वाचा व जनतेच्या फायद्याचा व लोकपयोगी उपक्रम म्हणून लोक समाधान व्यक्त करीत होते.
भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने तसेच सदर योजना यात्रा संयोजक माजी नगरसदस्य बिभीषण चौधरी, योजना नियोजक:भाजपा शहर उपाध्यक्ष:रवी देशपांडे, माजी नगरसेवक:सुरेश भोईर, भाजपा शहर सचिव महावितरण समिती सदस्य,मधुकर बच्चे ,माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे,अश्विनीताई चिंचवडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास व आलेल्या लोकांना जास्तीत जास्त योजना देणे व्यवस्था पहाण्याचे काम केले.
डॉ. संगीता तिरूमनी मॅडम ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी इतालेरा रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुशील सावंत (MO ), प्रियांका सर्वज्ञ (PHN)सारिका तावरे (MPW )अनुपमा लोंढे (ANM) कौशल्य मुंडे (ANM) माधुरी राऊत (ANM) पल्लवी गोबाडे (pharmasist) श्रवण वटकरी(वॉर्ड बॉय) वर्ष ,श्रुती गोसावी (Lab. Technician) राजकुमार बिराजदार आदिनी या उपक्रमात नागरिकांना सेवा व मदत केली.

संबंधित लेख

लोकप्रिय