पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:गजानन क्लिनिक व आगरवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गावडेनगर,गोलांडे इस्टेट,चिंचवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व आत्याधुनिक नेत्र तपासणी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.
परिसरातील नागरिकांचे आरोग्य कायम निरोगी व सुदृढ रहावे,यासाठी आमच्याकडून कायम प्रयत्न सुरु असतात त्यामुळे त्यातीलच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
या वेळी डॉ.जयकुमार ताम्हाने,राजू कोरे,उद्योजक उमेश गावडे,प्रसिद्ध व्यवसायिक गणेश बच्चे,जेष्ठ नागरिक संघाचे क्षेत्रीय काका,डॉ.ज्योती फेपाळे,यशोदा जाधव,कल्पना बुरुकुळे,जिनेश संपत,नीरज नमाला,आदी मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला,अत्याधुनिक नेत्र तपासणी मशीनद्वारे लोकांचे डोळे तपासणी करण्यात आली.व पुढील उपचाराची सविस्तर माहिती मार्गदर्शन करण्यात आले.डॉ.ज्योती पाटील यांनी रुग्णाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिरात ज्यांना डोळ्यांचे मोठे आजार निघाले त्यांना पुढील उपचार सुद्धा अल्प दरात मिळणार आहेत.उत्तम दर्जाचे शिबीर आयोजित केल्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत होते,आयोजकांना धन्यवाद देत होते.
गजानन क्लिनिकच्या संचालिका ज्योती पाटील ,यांनी शिबिराचे आयोजन केले होते.चैतन्य केमिस्टचे संचालक गणेश बच्चे यांनी शिबीर यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले.