लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी हाथरस दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी जाहीर केली आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कार्यक्रमांना परवानगी देताना कडक नियमावली करण्यात येणार आहे. सरकारने विशेष तपास पथक स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या घटनेची चौकशी केली जाईल. असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांना सांगितले. HATHRAS
कोट्यवधींची संपत्ती, पंचतारांकित आश्रम असलेल्या भोले बाबाच्या सत्संगाच्या कार्यक्रमास प्रशासनाने फक्त 80 हजार लोकासाठी परवानगी दिली होती.
मात्र सत्संगास 2 लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. या सत्संगात महिला, मुलांचे प्रमाण जास्त होते. मुळात अशा प्रकारच्या विविध बुवा, बाबाच्या कार्यक्रमात महिलांचे प्रमाण वाढले आहे. दुर्घटनेपुर्वीचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहे.
भोलेबाबाने दुपारी साडेबारा वाजता सत्संगास सुरवात केली. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे निघाले.
बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागले, आणि त्यानंतर मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीत 123 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 113 महिला 7 पुरुष आणि 3 मुले आहेत. HATHRAS
या प्रकरणी सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु भोले बाबावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेचा तपास उत्तरप्रदेश पोलिस करत आहेत.