Sunday, May 19, 2024
Homeकृषीहरियाणा : शहीद भगत सिंग यांच्या भाचीच्या हस्ते 'शहीद यादगार' पदयात्रेचे उदघाटन

हरियाणा : शहीद भगत सिंग यांच्या भाचीच्या हस्ते ‘शहीद यादगार’ पदयात्रेचे उदघाटन

हरियाणा : शहीद भगत सिंग यांची भाची गुरजीत कौर यांनी आज १८ मार्च रोजी हरियाणातील शहीद यादगार पदायात्रेचे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात उदघाटन केले. गुरजीत कौर या स्वतः गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात ठाण मांडून बसल्या आहेत. 

आज हरियाणा राज्यात हिसार जिल्ह्यात हांसी शहराच्या ऐतिहासिक लाल सडक येथून किसान सभा-सीटू-शेतमजूर युनियनच्या शेकडो जणांची हरियाणा राज्यातील शहीद यादगार पदयात्रा सुरू झाली. ही यात्रा पाच दिवस चालून २३ मार्च या शहीद दिनी टिकरी बॉर्डर येथे पोहोचेल. 

हिसार येथे झालेल्या जोरदार सभेस गुरजीत कौर, किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, शेतमजूर युनियनचे सहसचिव विक्रम सिंग, किसान सभेचे हरियाणा उपाध्यक्ष इंदरजीत सिंग आणि सीटूचे हरियाणा सरचिटणीस जय भगवान यांनी संबोधित केले. 

किसान सभेचे सहसचिव विजू कृष्णन, पंजाब सरचिटणीस मेजर सिंग, हरियाणा सरचिटणीस सुमित, बिहार सहसचिव पी. एन. राव हे याप्रसंगी उपस्थित होते. 

हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यातून आणखी एक अशीच पदयात्रा आज मोठी सभा घेऊन सुरू झाली. त्यात सीटूच्या सचिव ए. आर. सिंधू, किसान सभेचे कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, सीटूचे हरियाणा उपाध्यक्ष सुरेंद्र सिंग, किसान सभेचे हरियाणा अध्यक्ष फूल सिंग शेवकंद आणि जमसंच्या राज्य सचिव सविता यांनी संबोधित केले. ही यात्रा हांसी यात्रेला रोहतक येथे मिळेल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय