आळंदी/अर्जुन मेदनकर: येथील ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कुल सह आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ ते ४ अशा पाच शाळांत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षाच्या सुरुवातीस ‘ओळख ज्ञानेश्वरीची ‘ या उपक्रमांतर्गत हरिपाठ पाठांतर आणि ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रमाची सुरुवात १ जानेवारी पासून करण्यात आली. वर्षभर दर रविवारी तसेच शाळेच्या सोयीनुसार हरिपाठ दररोज उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात नव्या वर्षात करण्यात आली. यास शाळांतून मोठा प्रतिसाद मिळाला.
शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत हरिपाठ व ज्ञानेश्वरी या ग्रंथाची ओळख, शिकवण देऊन मुलांमध्ये भारतीय नीतिमूल्यांची रुजवण केली जाणार आहे याद्वारे सध्याच्या बदलत्या सामाजिक संदर्भात देखील संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले जाणार आहे.
मार्गदर्शक ह.भ.प. वासुदेव शेवाळे महाराज,श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे,विश्वस्त लक्ष्मण घुंडरे,श्रीधर घुंडरे, विश्वंभर पाटील,ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक,विलास वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव,ह.भ.प.वासुदेव शेवाळे महाराज, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ह.भ.प.तुकाराम ताजने महाराज,सोपान काळे,सुभाष दाभाडे,कैलास आव्हाळे,व्यवस्थापक विजय धादवड, नंदकुमार भालेराव आदी उपस्थित होते.
आळंदी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ ते ४ या चारही प्राथमिक शाळांसह ग्यानज्योत इंग्लिश मेडीयम स्कूल या प्रशालेत उपक्रम उत्साहात सुरु करण्यात आला.तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्री माऊलींचा हरिपाठ परिपाठात उत्साहात सुरू झाला. या उपक्रमास नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली. यावेळी शालेय मुलींनी हरिपाठ सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळवली.आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी यास संमती देत उपक्रम सुरु केल्या बद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी अभिनंदन करून उपक्रमास हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले.या उपक्रमात सहभागी शाळांतील मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले.यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातील अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या पेन ड्राइव्ह चे लोकार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शाळांना सार्थ श्री ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले.जिल्ह्यासह परिसरातील सुमारे ४५ शाळांमध्ये उपक्रम सुरु झाल्याचे मुख्य संयोजक प्रकाश काळे यांनी सांगितले.