Wednesday, November 20, 2024
Homeपर्यटनHaflong tour : आसाम - हाफलाँग निसर्गरम्य हिल स्टेशन (video)

Haflong tour : आसाम – हाफलाँग निसर्गरम्य हिल स्टेशन (video)

आसाममधील एकमेव हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेले हाफलाँग हे निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी आनंददायी ठिकाण आहे. उंच पर्वत, हिरव्यागार दऱ्या, निसर्गरम्य लँडस्केप आणि अननस आणि संत्र्याच्या बागा तुमच्या पर्यटनाचे आकर्षण वाढवतात, अतिशय स्वच्छ, सुंदर हवामान आहे इथे. (Haflong tour)


हाफलाँग हे आसामच्या दिमा हसाओ जिल्यातील एक सुंदर ठिकाण आहे. समुद्र स्तरापासून सुमारे 680 मीटर उंचीवर स्थित असलेले हे हिल स्टेशन ‘व्हाइट एंट हिलॉक’ म्हणूनही ओळखले जाते, आसामच्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

हाफलाँग मध्ये ट्रेकिंग, कॅम्पिंग, पक्षी निरीक्षण, निसर्ग, धबधबे आणि इतर नयनरम्य स्थळी तुम्हाला आनंद देतात. (Haflong tour)

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी
हाफलाँगला कसे पोहोचायचे:
जवळचे विमानतळ: सिलचर विमानतळ (105 किमी)
जवळचे रेल्वे स्टेशन: न्यू हाफलांग रेल्वे स्टेशन (७ किमी)
येथील रेल्वेप्रवास अवर्णनीय आहे, आपण स्वित्झर्लंड मध्ये आहोत, असेच वाटेल.

संबंधित लेख

लोकप्रिय