Friday, May 10, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा

मोठी बातमी : ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षात मोठ्या आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी रात्री उशीरा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यामुळे फडणवीसांनी  राज्यपालांकडे ठाकरे सरकारने बहुमत चाचणी सिध्द करण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याच्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावरून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उद्याच बहुमत चाचणी सिध्द करण्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे राज्यात उद्या फ्लोअर टेस्ट होणार आहे. सकाळी 11 वाजता राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले असून सायंकाळी 5 वाजेपर्यत बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. आमदारंच्या सुरक्षेसाठी ते आज महाराष्ट्राबाहेरील जवळच्या शहारात राहु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील सर्व आमदारांना बॅगा पॅक करून तयार रहा असा आदेश दिल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दर्शनाला आलो असून उद्या आमदारांना घेऊन मुंबईला पोहोचणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गुरूवारी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यपालांना ई-मेलद्वारे एक पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती आहे, सध्या शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही असं ते आमदार म्हणत आहेत. अशा परिस्थित राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय