पिरंगुट / दिपाली पवळे : दिनांक 22 जुलै रोजी संस्कार स्कूल पिरंगुट येथे गुरुपौर्णिमा (Gurupurnima) मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व पूजा प्रजापिता ब्रह्मकुमारी ज्योती दीदी, उज्वला दीदी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून आपल्या गुरुंबद्दलचा आदर, भावना व्यक्त केल्या. तसेच नृत्य, गायन, नाटक, चित्रकला, हाताने बनवलेले ग्रीटिंग्स, पुष्पगुच्छ यातून त्यांचा उत्साह दिसून येत होता. “नेहमी गुरू सांगतील तसेच वागावे, जीवनाचे कल्याण होते” हे दर्शवणारे नाटिका कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तसेच चिमुकल्यांनी केलेले नृत्य व सुंदर ग्रीटिंग कार्ड एकलव्य व द्रोणाचार्य यांच्या नाटिकेमधून गुरुप्रेम, गुरु आज्ञा यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गुरूंसाठी भजन गाण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पूजन केले व त्यांना ग्रीटिंग आणि पुष्पगुच्छ दिले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी विद्यार्थ्यांना गुरु मार्गावर कसे चालावे याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी विद्यार्थ्यांना गुरु शिष्यामधील नाते कसे असावे, गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान, गुरूंचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले देशमुख सर, राणा मॅडम व लता मुगावणे यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. (Gurupurnima)
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शोभा गोळे, सरस्वती कुऱ्हाडे तसेच अश्विनी बनसोडे यांनी मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा भोळे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा :
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर
नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा
आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी
Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी
जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद
मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार