Monday, May 20, 2024
Homeजिल्हानाशिक जिल्हा बँक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री व कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा -...

नाशिक जिल्हा बँक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री व कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा – राजू देसले

खरी माहिती घेऊनच वक्तव्य करावेत आवाहन !

नाशिक : नाशिक जिल्हा बँक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री व कृषी मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच खरी माहिती घेऊनच वक्तव्य करावेत, असे आवाहन नाशिक जिल्हा बँक वाचवा– सहकार वाचवा चळवळ नाशिक जिल्हा चे निमंत्रक राजू देसले यांनी केले आहे. 

देसले म्हणाले, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा उप निबंधक यांच्या उपस्थितीत नियोजन खरीप बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी नाशिक कार्यलयात संपन्न झाली. यात जिल्हा बँक संदर्भात चर्चा झाली. त्यात प्रसार माध्यमांना माहीत देतांना पालकमंत्र्यांनी जिल्ह्या बँक नॉटबंदी काळात 650 कोटी नोटा तून 300 कोटी रुपये पडून आहेत असे वक्तव्य केले आहे. मात्र  वास्तव तसे नाही. 371 कोटी 2016 मध्ये नोटबंदी काळात जमा होते. त्यातील 350 कोटी रिजर्व बँक व इतर बँकांनी जमा करून घेतले आहेत. 21 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. 

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदासाठी भरती, 12 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

8 जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकचा ही प्रश्न आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर समावेश आहे. हे पैसे जमा करून घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी. तसेच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्य शासनाने 900 कोटी रुपये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाले हे पैसे पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज वितरित करावे असे आवाहन केले होते. मात्र ह्या काळात ठेवीदार सुद्धा ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावत होतें. जिल्हा बँक ने कर्जवाटप  हे जमलेल्या ठेवी मधूनच केले होते. कर्जमुक्ती तुन मिळालेले 712 कोटी मुद्दल व 208 कोटीरुपये व्याजापोटी मिळावे होते. विभागीय सहनिबंधक व राज्य सरकार चे परवानगी घेऊन 15% रक्कम ठेवीदार ना वाटप केली होती. त्याला भ्रष्टाचार कसे म्हणता येईल?

आज नाशिक जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी कर्जदार व 14 लाख ठेवीदार बँक सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. 1650 कोटी रुपये थकबाकी कर्ज रक्कम आज आहे. एन पी ए मध्ये 1350 कोटी रुपये कर्ज आहे. थकबाकी प्रमाण 83% तर  तर एन पी ए प्रमाण 63% वर गेले आहे. कर्जवसुली न झाल्यास बँक परवाना रद्द होण्यासाठी रिजर्व बँक टपून बसली आहे. बँक परवाना रद्द झाल्यास ठेवीदार व कर्जदार अडचणीत येऊ शकतात. राज्य अथवा केंद्र सरकारने 728 कोटी रुपये जिल्हा बँकेला मदत भागभांडवल मध्ये उपलब्ध करून दिली तर बँक पूर्ववत होऊ शकते. यासाठी जिल्यातील मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, आजी माजी संचालक एकत्र येऊन मदत करावी. जिल्हा बँक चे घेतलेले कर्ज स्वतःचे व संस्थेचे भरून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा बँक वाचवा, सहकार वाचवा चळवळ करत असल्याचे देसले म्हणाले.

जिल्हा निवड समिती, हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 13 मे 2022 शेवटची तारीख

तसेच 2016 पूर्वी कर्ज घेतलेल्या कर्जदार ची वसुली केली जात आहे. बँक वाचवण्यासाठी कर्जदार नि कर्ज भरून मदत करावी. तसेच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व जमीन लिलाव लिलाव करण्याची वेळ का आली याचा विचार राज्य व केंद्र सरकारने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच आशिया खंडातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी बँक वाचवा, 1100 वर वि.का.सोसायटी वाचवा, व 14 लाख ठेवीदारांना कष्टच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी व 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्ह्यातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. व चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी. बँक वाचवण्यासाठी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना साथ द्यावी, भ्रष्टाचार करणारे व बँक अडचणीत आणणाऱ्या वर कठोर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय