नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये जीएसटीचा एकूण महसूल ९ टक्क्यांनी वाढून १.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन आहे. दसरा- दिवाळीनं सरकारची तिजोरी भरून गेली आहे. या मागे देशाच्या बाजारपेठेत स्थानिक विक्रीत मोठी झालेली वाढ आणि सुधारित संकलन हे मुख्य कारण होते. (GST collection)
केंद्र सरकारचा जीएसटी संग्रह ३३,८२१ कोटी, राज्य जीएसटी ४१,८६४ कोटी, एकत्रित आयजीएसटी ९९,१११ कोटी आणि उपकर १२,५५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण जीएसटी महसूल ८.९ टक्क्यांनी वाढून १,८७,३४६ कोटी रुपयांवर पोहोचला. ऑक्टोबर २०२३ मध्ये संग्रह १.७२ लाख कोटी रुपयांचा होता.
पाच राज्यात मोठी उलाढाल (GST collection)
महाराष्ट्र राज्यातील जीएसटी कलेक्शनमध्ये १४ टक्क्यांनी वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात ३१०३० कोटी रुपयांचं संकलन झालं तर गेल्या वर्षी २७३०९ कोटी रुपये झालं होतं. उत्तर प्रदेशमध्ये ९६२२० कोटी, कर्नाटकमध्ये १३०८१ कोटी, गुजरातमध्ये ११४०७ कोटी, हरियाणात १००४५ कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं आहे. या प्रमुख औद्योगिक आणि शहरी राज्यात दिवाळी साठी मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे जीएसटी संकलनात या राज्यांचा मोठा वाटा आहे. (GST collection)
या महिन्यातील जीएसटीमधील स्थानिक व्यवहारातून १०.६ टक्क्यांची वाढ होत १.४२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, तर आयातीवरील करातून मिळालेल्या महसूलात सुमारे ४ टक्के वाढ झाली आणि तो ४५,०९६ कोटी रुपयांपर्यंत गेला. (Gross GST collection increased by 9% in October to more than Rs.1.87 lakh crore, the second-highest ever)
केंद्र सरकारचे आर्थिक आरोग्य उत्तम असल्याने आणि बाजारपेठेत यावर्षी उत्साहात मोठी उलाढाल झाली आहे. त्यामुळे सरकारचे जीएसटी संकलन जास्त झाले आहे.असे अर्थतज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर