आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील निघोजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनिषा नंदकुमार बेंडाले यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी नितिन नाईकडे यांनी सांगितले. निघोजे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रुपाली येळवंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता. (Pune)
यामुळे उपसरपंच पदाची एक जागा रिक्त होती. उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाच्या निवडी साठी सरपंच सुनीता येळवंडे यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
अर्ज दाखल करण्याचे मुदतीत केवळ मनिषा नंदकुमार बेंडाले यांचा एकमेव अर्ज आला होता. तो अर्ज छाननीत वैध ठरला , एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी मनिषा नंदकुमार बेंडाले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा पीठासीन अधिकारी सुनिता येळवंडे यांनी केली. (Pune)
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंद्रे, अजित येळवंडे, समाधान येळवंडे, सागर येळवंडे, दिपक कांबळे, कोंडिभाऊ येळवंडे, प्रियांका आल्हाट, छाया येळवंडे, इंदिरा फडके, मनिषा बेंडाले , स्नेहा फडके, अलकाबाई येळवंडे, ग्रामविकास अधिकारी, आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व निघोजे गावातील ग्रामस्थ हिरामण येळवंडे, विष्णू बेंडाले, बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत बेंडाले, कैलास येळवंडे, नामदेव शिंदे, विकास येळवंडे, राहुल फडके, पप्पु नाणेकर, निलेश पवार, कांताराम येळवंडे, बाळासाहेब येळवडे, संतोष येळवंडे, भानुदास येळवंडे यांचेसह ग्रामस्थ तसेच बे़डाले परिवार, सेवक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपसरपंच मनीषा बेंडालें यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीचे परिसरातून स्वागत करण्यात आले.
हेही वाचा :
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर