Sunday, May 19, 2024
Homeराज्यDYFI चा ४० व्या वर्धापनदिनी आकुर्डीत कॉम्रेड दत्ता पाडाळे यांच्या प्रतिमेस अभिवादन...

DYFI चा ४० व्या वर्धापनदिनी आकुर्डीत कॉम्रेड दत्ता पाडाळे यांच्या प्रतिमेस अभिवादन !


आकुर्डी (पुणे) : डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आज चाळीशीत प्रवेश करत आहे. त्या निमित्ताने संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आकुर्डी येथे १९७९ साली बजाज कामगार आंदोलनात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कॉम्रेड दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पांजली अर्पण केली.

कोव्हिड मुळे शासकीय बंधने असल्यामुळे संघटनेने अतिशय साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला. पिंपरी चिंचवड शहरात गेली तीन दशके संघटना युवक, विद्यार्थी आणि श्रमिकांच्या प्रश्नावर काम करत आहे.

 

यावेळी DYFI चे सचिव सचिन देसाई म्हणाले, की नव्या आर्थिक उदारीकरणाच्या २५ वर्षातील कालखंडात अशाश्वत, कंत्राटी कामगारांची संख्या वाढली. सर्व सरकारी प्रशासन, रेल्वे, बँक, पोस्ट, वीज वितरण निर्मिती, दळण – वळण, परिवहन, रस्ते बांधणी, पाटबंधारे इ. अतिशय महत्त्वाच्या सरकारी खात्यामध्ये खाजगीकरण आणि कंत्राटीकरण सुरु झाले आहे. स्थायी स्वरूपाच्या लाखो नोकऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

खाजगी उद्योगमधील नवीन उत्पादन व्यवस्था आल्या मुळे पूर्वीची कुशल कामे आधुनिक यंत्रसामुग्रीवर होऊ लागली. त्याठिकाणी आता नीम, करार पद्धतीच्या अल्पवेतानाच्या नोकऱ्या निर्माण झाल्या. हे खरे असले तरी विवाह करून कुटुंब चालवणे युवापिढीला शक्य नाही.

देसाई पुढे म्हणाले की, संघटनेने राष्ट्रीय पातळीवर किमान २१ हजार रुपये वेतन द्या, अशी मागणी केली आहे. सरकारी रिक्त जागा भरा, पदवी आणि अभियांत्रिकी, संगणकीय पदवी शिक्षण मोफत द्यावे, युवतींंना महापालिका, शासकीय कार्यालयात नोकरीला प्राधान्य द्यावे, बॅचलर कामगारांच्या निवासासाठी औद्योगिक शहरात नवी वसतिगृहे उभारावीत, शहरातील विवाहित हंगामी कामगारांसाठी भाडेतत्वावर सरकारी गृहनिर्माण मनपाने करावे, मनपाच्या सर्व शाळा इंग्रजी कराव्यात, आणि तेथे शिक्षक भरती करावी, नायडू रुग्णालयाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मनपाने साथीच्या रोगावर उपचार करणारे मोठे रुग्णालय बांधावे, या मागण्यासाठी नव्या वर्षात संघटना विशेष मोहीम राबवणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आर्थिक धोरणावर यावेळी टीका करण्यात आली. परदेशी भांडवल देशात आहे, येत आहे. मात्र त्या प्रमाणात शाश्वत नोकऱ्या निर्माण होत नाही. देशात कायम स्वरूपाची बेरोजगारी रहावी, कमी वेतनावर राबण्यासाठी एक पिढी भांडवलदार वर्गाला पिळवणूक करण्यासाठी मिळावी, अशा प्रकारची आर्थिक नीती सरकार राबवत आहे, असे ही ते म्हणाले.

यावेळी DYFI चे गणेश दराडे, विनोद चव्हाण, अविनाश लाटकर, किसन शेवते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय