Sunday, May 19, 2024
Homeराज्यDYFI या देशातील युवक संघटनेची संघर्षशील ४० वर्ष; पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी...

DYFI या देशातील युवक संघटनेची संघर्षशील ४० वर्ष; पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना !

पुणे : देशातील संघर्षशील युवक संघटना असलेल्या डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) ची स्थापना ३ नोव्हेंबर १९८० रोजी पजांब राज्यातील लुधियाना येथे स्थापना करण्यात आली.

DYFI ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे. जात, भाषा, धर्म आणि प्रांत या संकुचित विचारसरणीत अडकलेल्या युवाशक्तीला त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी एकत्र करण्यासाठी अविरत संघर्ष करत आहे.

शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव या क्रांतिकारकांच्या समाजवादी विचारसरणीच्या या युवा संघटनेच्या २ हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे.

सर्वाना शिक्षण, सर्वाना काम मिळालेच पाहिजे. पदवीपर्यंत सर्व शिक्षण मोफत देऊन त्यासाठी केंद्रीय अंदाज पत्रकात १०% टक्के तरतूद करा, काळाच्या गरजेनुसार तंत्रवैज्ञानिक आणि संगणक प्रशिक्षण देऊन कुवतीनुसार काम आणि कामाचे उचित दाम मिळावे. अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्यांक मुलामुलींना शिष्यवृत्ती देऊन गाव तेथे शाळा, तालुकास्तरावर वसतिगृह माफक दरात पोषण आहार देऊन सर्वव्यापी शिक्षण प्रसार कारावा, नोकर भरती वरील बंदी उठवा, सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या रिक्त जागा भरा, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक युवतीसाठी भारतीय मैदानी खेळासाठी स्वतंत्र क्रीडांगणे व्यायाम शाळा उपलब्ध करून होतकरू विद्यार्थी युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेसाठी प्रोत्साहन द्या. कंत्राटी आणि हंगामी कामगार प्रथा रद्द करा, किमान वेतन २१००० रुपये आणि सर्व कायदेशीर हक्क द्या. मनरेगा आणि शहरी रोजगार हमीची कामे आणि शासकीय निधीतून ग्रामविकास आणि शहर विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी जेथे राहतात तेथे रोजगार द्या.रोजगार प्राप्त होईपर्यंत दरमहा ५००० रुपये भत्ता द्यावे. हिंदू आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी दंगेखोर विचारसरणीच्या संस्था संघटनावर बंदी घाला, नव साम्राज्यवादी अनिर्बंध जागतिकीकरणावर नियंत्रण ठेवा, भारतीय उद्योग आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्र विकसित करून निर्यातीला वाव देणारी मूलभूत गरजेची उत्पादने विकसित करा, सर्व युवक आणि युवतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाठी स्वतंत्र आयोगाची नेमणूक करा, अशा मागण्यांना घेऊन DYFI अविरत संघर्ष करत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १९८७ साली ७ युवक युवतींनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली. या पिंपरी चिंचवड शहरातील काही युवकांशी ‘महाराष्ट्र जनभूमी’ ने संवाद साधला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अभिमान आतकरे सांगतात, संघटनेने लोकांना उपाशी राहू दिले नाही. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये गरजू कामगाराना घरोघरी किराणा किट वाटप करुन लोकांची चूल बंद पडू दिली नाही, सलग चार महिने अन्नधान्य पुरवठा करून महान कार्य DYFI ने केले आहे. सर्व शासकीय योजना, जनतेच्या हिताचे कायदे, मोफत आरोग्य सुविधा इ. सर्व माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांंकडे असल्यामुळे आमच्या घरकुल योजनेसाठी आम्हाला सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय मदत केली. संवेदनाशून्य नोकरशाही आणि भ्रष्ट लोकांना वठणीवर आणणारी संघटना आहे.

तर घरकुल लाभार्थी शिवशंकर व गिता दोडमनी सांगतात, आमच्या घरकुलासाठी त्यांनी लाठ्या खाल्ल्या. गरिबांना स्वस्तात घरे मिळावीत आणि २००८ मधील सरकारची चिखली मधील घरकुल योजना वेळेत पूर्ण करावी, यासाठी DYFI चे गणेश दराडे, सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, देविदास जाधव, विनोद चव्हाण इ. प्रमुख कार्यकर्त्यानी घरकुलसाठी प्रसंगी लाठ्या खाऊन यशस्वी लढा दिला. DYFI मुळे घरांचे स्वप्न पूर्ण झाले.

तर प्रा. मेघना भोसले सांगतात की, DYFI ही समता आणि सामाजिक परिवर्तनासाठी लढणारी संघटना आहे. १९८७ मध्ये महाविद्यालयात असताना DYFI मध्ये सामिल झाले. शाहू, फुले, आंबेडकर, भगतसिंग यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य मिळावे आणि सर्व युवक युवतीच्या आर्थिक आणि सांस्कृतिक सबलीकरणासाठी हि युवक चळवळ आहे.

तर आरोग्य विमा सल्लागार सतीश मालुसरे सांगतात, की प्रधान मंत्री आवास योजना, आर्थिक दुर्बल पेंशन योजना इ. सर्व शासकीय कामे डिजिटल आणि ऑनलाइन करून सर्वात खात्रीशीर सेवा देते. युवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खुले व्यासपीठ आहे.

तर मॅक्सिस मोशन कंट्रोल कंपनीमध्ये काम करणारे सुनिल साबळे सांगतात, की कोरोना काळात संघटनेने अनेक रुग्णांना सरकारी, वाय. सी. एम. हॉस्पिटल आणि सरकारच्या सेवेची माहिती दिली. मोफत १०८ अंबुलन्स सेवा, अधिकृत आणि मोफत उपचार कसे मिळतात, याचे मार्गदर्शन केले. २४ तास संघटना काम करत होती. मनपाच्या कोव्हिड तपासणी केंद्राची माहिती मिळाल्यामुळे माझ्या कुटुंबियांना चांगले उपचार मिळाले.

तर निवृत्त कर्मचारी विलास शिरवले, तानाजी बांदल म्हणाले, कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी एक वाटी तांदूळ मूठभर धान्य दान करा. या मोहिमेत कार्यकर्ते घरोघरी दान मागत होते. सलग २ आठवडे या मोहिमेत कार्यकर्ते सहभागी झालेले आम्ही पाहिले. मानवतेच्या विचाराने काम करणारी ही संघटना आहे.

तर शैलजा कडुलकर – पानशेट्टी सांगतात की, आकुर्डीमध्ये १९८८ साली DYFI मध्ये सामील झाले. आय. टी. आय., कॉलेज विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या मागण्यासाठी मुंबई आणि दिल्ली येथील महामोर्च्यात सामील झाले. समतावादी विचारसरणीमुळे आंतरजातीय विवाहाचे धाडस करू शकले. संघटनेमुळे महिला बचत चळवळीचे महत्व कळले. बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिक सबळ बनवले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय